Ads

Breaking News

 आज नंदिनी लग्न करून तिच्या सासरच्या घरी गेली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. आपल्या माहेरच्या घरची आठवण करून ती रडत असेल असेच सर्वांना वाटले. पण ती का रडत होती हे फक्त नंदिनीच्या मनालाच माहीत होतं? कारण तिच्या माहेर घरात असे कोणी नव्हते ज्यासाठी तिने अश्रू ढाळावे.


तिचे काका-काकू तिला नेहमीच वाईट वागणूक देत असे. नंदिनीचे आई-वडील या जगात नव्हते.

<

तिचे संगोपन तिच्या काका-काकूंनीच केले. नंदिनीचे घरही तिच्या काका-काकूंनीच विकले आणि तिच्या पालनपोषणाच्या नावाखाली त्यांनीच सर्व पैसे गडप केले. आता लग्नाच्या वयात आल्यावर नंदिनीचे शिक्षण अर्धवट सोडवुन तिचे लग्न लावून देण्यात आले. नंदिनीने लग्नाआधी तिचा भावी वरही पाहिला नाही कारण तिची काकु तिला टोमणे मारत राहायची, की आम्ही काय तुझ्यासाठी अपंग वर शोधणार आहोत का? मात्र जेव्हा नंदिनीने लग्नमंडपात आपला वर पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. तेव्हापासून ती खूप घाबरली होती. सासरच्या घरी येऊनही तिला शांती मिळत नव्हती. पण सासरच्या घरात तिची सासू, सासरे, वहिनी सगळेच तिच्याशी खूप प्रेमाने वागत होते.

पण तरीही ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं त्या व्यक्तीचा विचार करून तिचं हृदय वेदनेने फुटत होतं. रात्री, जेव्हा ती लग्नाच्या खोलीत बसली होती, तेव्हा ती धडधडत्या हृदयाने तिचा नवरा येण्याची वाट पाहत होती कारण तिला माहित होते की आजची रात्र कयामतची रात्र असणार आहे.काही वेळाने तिचा नवरा प्रभात खोलीत आला, तो येताच त्याने तिचा पदर उचलला आणि तिला जोरात चापट मारली आणि म्हणाला, "चल उठ आता, आणि माझ्या थोबाडीत मारून दाखव? त्या दिवशी तू बाजारात मला थोबाडीत मारली होतीस ना,? म्हणून मी तुझा बदला घेतला आहे." तुझा बदला घेण्यासाठीच मी तुला माझी पत्नी बनवून आणले आहे. आता मी रोज रात्री तुझा स्वाभिमान तोडीन."एवढं बोलून त्याने लाईट बंद केली आणि मग तो तिच्या अस्तित्वाचा चुराडा करू लागला. अचानक झालेला हा हल्ला नंदिनीला सहन होत नव्हता. जणू तिची विचार करण्याची आणि समजण्याची शक्तीच संपली होती. जेव्हा तो तिला वेड्यासारखा ओरखडु लागला तेव्हा नंदिनीने हिंमत एकवटली आणि तिने जोरात लाथ मारून त्याला स्वतः पासून दूर केले. जेव्हा त्याच्या बायकोने त्याला लाथ मारली तेव्हा तो संतापला आणि म्हणाला की तुझ्या एका थप्पडचा बदला घेण्यासाठी मी तुला माझी गुलाम बनवले आणि आता तू मला लाथ मारते आहेस? बघ.. तुला आता याची किती मोठी किंमत मोजावी लागेल?"

असे म्हणत तो पुन्हा तिच्या अंगावर तुटून पडला. नंदिनीने विजेच्या वेगाने जवळ पडलेली फुलदाणी उचलली आणि ओरडली, "सावधान, माझ्या दिशेने एक पाऊलही टाकलेस तर मी तुझे डोकेच फोडेन." तिचे हे रूप पाहून प्रभात स्तब्ध उभा राहिला. इतक्यात नंदिनीने संधी साधून पटकन धावत जाऊन दरवाजा उघडला आणि खोलीबाहेर गेली.

त्यानंतर जी पहिली खोली तिच्या समोर होती. तिने त्याच खोलीचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली. योगायोगाने तिची नणंद तिच्या पतीसोबत त्या खोलीत थांबली होती. तिने दार उघडले तेव्हा आपल्या नवविवाहित वहिनीला या अवस्थेत पाहून तिला आश्चर्य वाटले. नंदिनी तिला चिकटून म्हणाली, "दीदी, प्लीज मला वाचवा... तुमचा भाऊ क्रूरतेत उतरला आहे."त्यानंतर प्रभातही रागाने खोलीतून बाहेर आला आणि नंदिनीचा हात ओढत म्हणाला चल इथुन.. तू माझी पत्नी आहेस, आणि खोलीतल्या गोष्टी बाहेर जायला नकोत. चल खोलीत परत चल... पण नंदिनी कोणत्याही किंमतीत तिथून निघायला तयारच नव्हती. तिला सतत रडतांना बघुन प्रभातची बहीण शीतल म्हणू लागली.

"भाऊ,सोड वहिनीला...हे तू काय करतोयस? आज तुझ्या नवीन नात्याची सुरुवात आहे आणि तू तुझ्या बायकोला पहिल्याच रात्री असं रडवतोयेस? हे सगळं करण्याआधी, तू विसरलास की तुलाही एक बहीण आहे, तिच्यासोबतही असेच झाले तर तुला ते आवडेल का?" प्रभात रागाने म्हणाला,"हे बघ, तुझा विषम मध्ये आणू नको.तु माझ्या प्रकरणापासून दूर राहा." आरडाओरडा ऐकून प्रभातचे आई-वडीलही तेथे पोहोचले. नंदिनीने सासूला पाहिल्यावर ती धावत तिच्याकडे आली आणि तिला मिठीत मारुन रडू लागली आणि म्हणाली, "आई, हे बघा, प्रभात माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते." यावर तिच्या सासू सूमित्राबाई आश्चर्याने म्हणाल्या, “सूनबाई, तुला नवरा बायकोच्या नात्याबद्दल काही माहिती आहे की नाही?

हा तुझा नवरा आहे. हा जर तुझ्यावर अधिकार दाखवणार नाही तर दुसरे कोण दाखवेल?” यावर नंदिनी रडायला लागली आणि म्हणाली, “आई, मला माहीत आहे की नवरा-बायकोचे नाते काय असते? पण यांनी माझ्याकडून बदला घेण्यासाठी माझ्याशी लग्न केले आहे आणि यांना मला खूप वेदना द्यायच्या आहेत." असे म्हणत ती हिचकीने रडू लागली, तर प्रभातचे आई-वडील स्तब्ध झाले.

नंदिनीचे सासरे अखिलेशराव म्हणू लागले, "काय झालं सुनबाई? मला सगळं स्पष्ट सांग." तर नंदिनी रडायला लागली आणि म्हणाली, "बाबा, एकदा तुमच्या मुलाने बाजारात एका लहान मुलीची छेड काढली, म्हणून मी भर बाजारात त्याला थप्पड मारली. माझे लग्न ठरले तेव्हा मावशीने मला प्रभातचा फोटोही दाखवला नाही. तूम्ही लोक मला बघायला आले,पण माझा होणारा नवरा मला बघायला आला नाही याचा अर्थ मला तेव्हा समजला नाही. पण नंतर मला हे सर्व समजले. प्रभातने मुद्दाम मला लग्नाआधी कळू दिले नाही की तोच माझा होणारा नवरा आहे. लग्नात मी प्रभातचा चेहरा पाहिला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माझ्या माथी त्याच्या नावाचा सिंदूर लावला गेला होता. जोपर्यंत मी काही समजू शकत होते,

तोपर्यंत मी तिथून निघून माझ्या सासरच्या घरी आले होते. मी खूप घाबरले होते आणि विचार करत होते की मी अशा माणसाशी लग्न कसे केले?जो लग्नाआधी मुलींना छेडायचा? पण तरीही मी हे माझं नशीब मानलं आणि मला वाटलं की काही हरकत नाही, जर तो माझ्यासोबत प्रेमाने जगेल, तर मीही हे नातं टिकवून ठेवेन. कारण तो माझा नवरा आहे आणि माझी काकु आधीच म्हणाली होती,

की लग्नानंतर मी तुझी जबाबदारी घेणार नाही. मात्र लग्नाच्या रात्री खोलीत येताच त्याने मला थप्पड मारली आणि माझ्या थप्पडचा बदला घेण्यासाठी मी तुला माझी पत्नी बनवले आहे, असे सांगितले. त्यानंतर तो माझ्यासोबत क्रुरतेत उतरला. मग मी काय करू?" एवढे बोलून ती ढसाढसा रडू लागली. प्रकरण खूप गंभीर होते.

प्रभात आता घरच्यांच्यापासुन नजर चोरत होता. अखिलेशराव बोलू लागले, "प्रभात, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. तू जेव्हा नंदिनीशी लग्न करण्याविषयी बोललास तेव्हा मला वाटलं की तुला नंदिनी आवडली आहे आणि तू तिला न भेटताही नातं फायनल करण्याचा हट्ट करू लागलास. तेव्हा मला वाटलं. की तुला हे नाते आवडले आहे, म्हणूनच तु मुलीकडे जाण्याचा विचार करत नाही.मी तुझा फोटो नंदनीच्या काकूंना दाखवला. पण तिच्या काकुनेही तिला तो फोटो दाखवला नाही, हे आश्चर्यकारक आहे.यावर प्रभात रागाने ओरडत म्हणाला, कारण मी तिच्या काकुला पैसे दिले होते की तिला लग्नाआधी कळू नये की मी तिचा होणारा नवरा आहे. नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाली, "याचा अर्थ माझ्या काकुनेही माझी फसवणूक केली आहे.

आता माझे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे." यावर तिची सासू म्हणाली, "सूनबाई, माझ्या खोलीत चल, तू खूप थकली आहेस, विश्रांती घे. या विषयावर आपण नंतर बोलूयात." असे म्हणत ती नंदनीला तिच्या खोलीत घेऊन गेली

No comments